"काय तुझी माया सांगू श्रीरंगा
संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा.
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलिया अभंगा
विठ्ठला पांडुरंगा.........."
आपणांस व आपल्या कुटुंबियांस आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा....
आषाढी एकादशीचा पंढरी सोहळा म्हणजे वारकऱ्यांसाठी जन्माचे सार्थक होईल असा योग असतो,संत भानुदास म्हणतात की या आनंदाची महती फक्त पुंडलिकच जाणू शकेल. महाद्वारी लोटांगण घालणारा वारकरी आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येकात विठू माऊली पाहत असतो.असा हा आषाढीचा अमृतयोग #अक्षरकलावारी #आषाढीएकादशी